कुणासोबत युती करायची हे पवारसाहेब ठरवतील, आमचे उमेदवार ‘तुतारी’वर लढतील; प्रशांत जगतापांनी पुण्याची स्ट्रॅटेजी सांगितली

घोरपडी न्यूज

पुणे : शरद पवार हे आमचे नेते असून महापालिका निवडणुकीसाठी कुणासोबत युती करायची याचा निर्णय तेच घेतील, आमच्या वाट्याला ज्या जागा येतील त्या तुतारी या चिन्हावरच लढवल्या जातील असं शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप (Prashant Jagtap) यांनी सांगितलं. पुण्यात आम्ही चांगली मोर्चेबांधणी केली आहे, लोकांना वेगळा पर्याय हवा आहे असंही ते म्हणाले.

राज्याचे लक्ष लागलेल्या पुणे महापालिकेसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीत पक्षाच्या तयारीची माहिती प्रशांत जगताप यांनी दिली. तसेच पुण्यात अजित पवार आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीची युती होणार असल्याची चर्चा सुरू आहे. त्यावरही प्रशांत जगताप यांनी प्रतिक्रिया दिली.

माझे नेते हे पवार साहेब आणि सुप्रिया सुळे आहेत. मी साहेबांवर विश्वास ठेऊन आलोय, मला त्यांच्याबाबत खात्री आहे. मी जाहीरनामा दिला आहे. पक्षाने कुणासोबत युती करावी हा पवारसाहेबांचा निर्णय आहे असं प्रशांत जगताप म्हणाले.


घोरपडी न्यूज

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button