महाराष्ट्रातील नगरपरिषद (Municipal Council) आणि नगरपंचायत (Nagar Panchayat Elections) निवडणुकांच्या निकालात भारतीय जनता पक्षाने (Bharatiya Janata Party) दमदार कामगिरी करत पुन्हा एकदा राज्यातील नंबर 1चा पक्ष होण्याचा मान मिळवला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या विकासाभिमुख नेतृत्वाला आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांच्या संघटन कौशल्याला मतदारांनी स्पष्ट कौल दिल्याचं दिसून येतंय.

या निवडणुकांमध्ये भाजपाला अभूतपूर्व यश मिळाले असून, “तुमची आमची भाजपा सर्वांची” हा प्रचारातील संदेश प्रत्यक्ष मतदानातून खरा ठरल्याचे चित्र आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निकालांनी भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.